ncp-district-president-announces-executive-body-controversy : माजी जिल्हाध्यक्षाचा आरोप, राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा पेटला
Nagpur जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. पक्षपातळीवर कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत असा आरोप करून माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी स्वतंत्र बैठक घेताच विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे यांनी तडकाफडकी नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.
५१ पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारणीमध्ये जिल्हा कार्याध्यक्ष नरेश अरसडे तर उपाध्यक्ष म्हणून खेमराज खोंडे, सुरेंद्र मोरे, संतोष नरवाडे, संगित मानस पारधी, प्रशांत ठाकरे, सत्यजित शर्मा, लक्ष्मण संगेवार यांची निवड झाली आहे. किरण झाडे, अशोक पाटील, डॉ. चंद्रशेखर समर्थ (सर्व सहसचिव), ज्योती कुमरे, पांडुरंग गायकी, आचल हुलके, रोहीत मानवटकर, स्वप्निल वाघधरे, यशवंत शहाने, राजेंद्र हटवार, पद्माकर बावणे, पुरुषोत्तम कावळे, राजू तलमले, विष्णू मांढरे, प्रकाश चौधरी, विवेक वानखेडे, सुहास कांबळे, संजय झोडापे (सर्व जिल्हा सचिव), सावनेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबा झाडे, कामठी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. नौशाद सिद्दीकी, उमरेड विधानसभा क्षेत्र पुंडलिक राऊत, हिंगणा विधानसभा क्षेत्र डॉ. देवेंद्र कैकाडे, रामटेक विधानसभा क्षेत्र गणेश पानतावणे यांची निवड झालेली आहे.
Sudhir Mungantiwar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त शब्द नव्हे, ठोस धोरणे आवश्यक!
तालुका अध्यक्ष म्हणून अशोक गोयल (भिवापूर), सुरेंद्र वानखेडे (सावनेर), विलास झोडापे (उमरेड), राहुल खडसे (कळमेश्वर), नामदेव आंबीलडुके (कुही), पुष्कर बंडावार (नागपूर) यांचा समावेश आहे. शहराध्यक्ष म्हणून सोयब हसन (कामठी), अखिल शेख (बुटीबोरी), मदन कोहळे (बेसा- पिपळा), सुरेश गुरनुले (कुही), मिर्झा बाबाराव सानप (डिगडोह शहर), राकेश तुरकर (वानाडोंगरी शहर), अमित तायडे (वाडी शहर), घनशाम लव्हे (उमरेड), गोपाल घटे (सावनेर).
High court : सरपंचांना प्रशासक नेमले, न्यायालयाची सरकारला नोटीस!
याबाबत बोलताना डॉ. राजाभाऊ टाकसाळे म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्यासाठी नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. उर्वरित कार्यकारणी १५ दिवसाच्या आत जाहीर करणार आहे. जिल्हाभर दौरे करून ४७ जिल्हा परिषद सर्कलमध्ये दौरे करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहे.








