व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना

Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना

Akola witnessing murders daily, guardian minister not concerned : पोलिसांवर नेत्यांचा, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नाही

Akola अकोला जिल्ह्यात एप्रिल महिन्यात घडलेल्या सलग गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. खून, महिलांवरील अत्याचार, जाळपोळ, पोलिसांवरील हल्ले आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरलेला नसल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे राजकीय नेतृत्वाकडूनही या गंभीर परिस्थितीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी अद्याप परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलेला नसल्याने नागरिकांत संताप आहे.

Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरले !

एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्यात खुनाच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. शहरातील एमआयडीसी परिसरात शुक्रवारी रात्री भर चौकात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही जुन्या वैमनस्यातून आणि कौटुंबिक वादातून घडलेल्या हत्या जिल्ह्यात खळबळ उडवून गेल्या आहेत.
याच महिन्यात एका विवाहित महिलेला ठार मारून तिचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डबकी रोड परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिस तपासात तिच्या पतीसह तिघांना अटक करण्यात आली. या घटनेने जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, एका पोलीस ठाण्यात तपासासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवरच स्थानिक पोलिसांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “पोलीसच पोलिसांना मारत आहेत” अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत असून, यामुळे पोलिस दलातील समन्वय आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय चोरी, घरफोडी, अवैध धंदे, मारहाण आणि वाहतूक अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ, संवेदनशील भागांत कडक पोलिस बंदोबस्त आणि तातडीच्या प्रतिसाद यंत्रणेची मागणी केली आहे.

Earthquake : महाराष्ट्र हादरला; विदर्भ आणि मराठवाड्यात सौम्य भूकंपाचे धक्के !

पोलीस प्रशासनाने खुनांच्या घटनांचा तपास वेगाने सुरू असून विशेष पथके नियुक्त केल्याचे सांगितले आहे. मात्र सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

error: Content is protected !!