व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola Airport : अकोला विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचे ‘टेक ऑफ’; विशेष निधीही मिळाला!

Akola Airport : अकोला विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचे ‘टेक ऑफ’; विशेष निधीही मिळाला!

Special funding for Akola Airport; land acquisition process underway : राज्य सरकारकडून बुस्ट; लहान विमानांची सेवा तातडीने सुरू करण्यासंदर्भात विचार

Akola अकोला विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विमानतळासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकोल्यातून लहान विमानांची सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.

अकोला विमानतळावरून हवाई सेवा सुरू करण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासोबतच यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री तसेच राज्यमंत्र्यांकडेही यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोल्यातील हवाई संपर्क बळकट करण्याबाबत धोत्रे यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत प्रश्नही उपस्थित केला होता.

Akola-Khandwa railway track : अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मार्च २०२७ चे टार्गेट!

खासदारपदी निवड झाल्यानंतर अकोल्याच्या विकासाला प्राधान्य देत केंद्र आणि राज्य शासनाकडे विविध विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातूनही या कामांसाठी समन्वयाने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता जुन्या फाइल्स उघडणार!

अकोला विमानतळाच्या विकासासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित विभागामार्फत राबविली जाते. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जमीन अधिग्रहण विभागाची स्वतंत्र नोंद असून, सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची कार्यपद्धतीही नमूद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!