Akola congress gets new presidents for city and district body : दीर्घकालीन पक्षनिष्ठेला न्याय; संघटन सृजन अभियानाचा परिणाम
Akola काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अकोला महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र गवई यांची निवड करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षश्रेष्ठींनी दोन्ही नेत्यांवर दाखविलेला विश्वास हा त्यांच्या दीर्घकालीन पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या मजबूत संपर्काचा गौरव मानला जात आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रकाश तायडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, शहरातील काँग्रेसची ताकद वाढविणे, युवक व सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करणे, ही मोठी जबाबदारी महेंद्र गवई यांच्या खांद्यावर असणार आहे.
150 crore fund : अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी, स्वयंरोजगाराला मिळणार नवी चालना
आगामी काळात काँग्रेस पक्ष जिल्ह्यात अधिक सक्रिय आणि आक्रमक पद्धतीने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात काँग्रेसला नवचैतन्य मिळून पक्ष संघटना गावपातळीपासून शहरापर्यंत अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.








