Akola Congress : संशयित म्हणून नाव आले आणि पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला

suspects in the murder case suspended from the party : हिदायत पटेल हत्याप्रकरणात गुन्हे, काँग्रेसचे राजीव बोचे, संजय बोडखे निलंबित

Akola काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात आरोपी म्हणून नावे समाविष्ट झाल्याने आणि फौजदारी गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. अकोट येथील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे तसेच अकोट विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिलेले आणि अकोट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
या संदर्भातील अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी संबंधितांना दिले आहे. पक्षशिस्तीच्या दृष्टीने तसेच नैतिकतेच्या मुद्द्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Amravati Municipal Council : अमरावती मनपात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली

अकोट तालुक्यातील मोहाळा येथील सहकार क्षेत्रातील नेते तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर ६ जानेवारी रोजी दुपारी गावातील मशिदीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोट तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी मृत हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकोला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे आणि अकोट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे यांच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.

Akola Municipal Council : भाजप सत्तेसाठी फोडाफोडीची ‘मशाल’ पेटवणार!

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागल्यानंतर काँग्रेस पक्षानेही कठोर भूमिका घेतली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार संबंधित दोन्ही नेत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती ॲड. गणेश पाटील यांनी दिली. पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये तसेच कायद्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप होऊ नये, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या निलंबनामुळे अकोट तालुक्यातील काँग्रेस राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.