व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Akola crime : पुण्यानंतर अकोल्यातही… 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Akola crime : पुण्यानंतर अकोल्यातही… 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

 

sexual-assault-cases-rise-pune-akola-minor-girl-attack-news : राज्यात वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून राजकीय वातावरण तापले

Akola : राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या सलग उघड होत असलेल्या घटनांमुळे समाजमन संतप्त झाले असून या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. पुण्यातील अलीकडील धक्कादायक घटनांनंतर आता अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते कामावर गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या वृद्धाने या मुलीला एकटे पाहून गेल्या चार ते पाच दिवसांपासून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे चिमुरडी सुरुवातीला गप्प होती, मात्र आई-वडिलांनी विश्वासात घेतल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Tamilnadu Politics : सत्तेच्या उंबरठ्यावर विजयला घ्यावा लागतोय काँग्रसचा पाठिंबा? काँग्रेसने मागितली दोन मंत्रिपदे

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे आणि नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

https://sattavedh.com/amol-mitkari-long-list-of-aspirants-from-akola-keen-to-enter-the-legislative-council/

दरम्यान, पुण्यातील पर्वती परिसरातही एका 70 वर्षीय आजोबाने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि आरोपीला अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे नसरापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अद्यापही राज्याला हादरवून सोडत आहे.

या सलग घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महिलां आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

___

error: Content is protected !!