Morna River, praised by the Prime Minister, is covered with water lilies : स्वच्छता अभियानाचा बोजवारा; लाखो रुपयांचा अपव्यय
Akola : अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून प्रारंभ करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘मन की बात’ या कार्यक्रमात या अभियानाचे कौतुक केले होते. मात्र, प्रत्यक्षात या अभियानाच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपव्यय झाला. नदी पात्रातील जलकुंभी काढण्याच्या प्रक्रियेत केवळ दिखाऊ कामे करण्यात आली. त्यामुळे आज पुन्हा जलकुंभीने संपूर्ण नदी व्यापली आहे.
कधीकाळी अकोला शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मोर्णा नदी प्रशासनाच्या अनास्थेमुळे पूर्णतः दूषित झाली आहे. शहरातील सांडपाणी निचर्यासाठी कोणत्याही पर्यायी उपाययोजना न करता थेट नदी पात्रात सोडण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून नदीतील पाणी अत्यंत दूषित झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीकाठच्या नागरिकांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. वाढत्या घाणीमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
Holi festival : होळी उत्साहाचा सण; रंगांची उधळण करा, पण जपून..
महापालिका प्रशासनाने जलकुंभी हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे नदी स्वच्छतेचे कार्य अर्धवटच राहिले. त्यामुळे लाखो रुपयांचा अपव्यय झाला आहे. प्रत्यक्षात नदीतील घाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे मोर्णा नदी पुन्हा दयनीय अवस्थेत पोहोचली आहे.
Shakti Peeth Highway : समृद्धी नागपुरातून तर शक्तीपीठ सुरू होणार सेवाग्राममधून
नगरविकास विभाग आणि पर्यावरण विभागाने या परिस्थितीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी आणि जनतेच्या आरोग्यासाठी मोर्णा नदीच्या कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.








