Akola Municipal Corporation : समित्या अनेक, अर्ज सात! उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

Decision-on-committee-chairperson-posts-in-Akola-Municipal-Corporation-on-March-2 : अकोला महापालिकेतील सभापतीपदासाठी चुरस, २ मार्चला फैसला

Akola अकोला महानगरपालिकेतील विविध समित्यांच्या सभापती पदासाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार एकूण सात उमेदवारांनी विविध समित्यांसाठी आपली उमेदवारी अर्ज सादर केली आहे.

स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी विजय कमल किशोर अग्रवाल (शहर सुधार आघाडी) आणि मोहम्मद फजल अब्दुल करीम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी आरती प्रकाश घोगलिया (शहर सुधार आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’

प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठीही उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले असून,पूर्व प्रभाग समितीसाठी अवचार रश्मी प्रशांत, पश्चिम प्रभाग समितीसाठी धोटे राजेश्वर केशव, उत्तर प्रभाग समितीसाठी जनाब बी. शेख इब्राहिम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), तर दक्षिण प्रभाग समितीसाठी गवांडे पूजा पंकज (शहर सुधार आघाडी) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Eknath Shinde : अजितदादांच्या विमान अपघातानंतर शिंदेंचा मोठा निर्णय

महानगरपालिकेतील समित्यांच्या सभापती निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, २ मार्चला निवड सभेत या पदांवरील निर्णय स्पष्ट होणार आहे.