व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Siddharth Kharat : वंचित-भटक्या समाजाची अस्मिता, महापुरुषांच्या जयंतीला सुट्या द्या!

Siddharth Kharat : वंचित-भटक्या समाजाची अस्मिता, महापुरुषांच्या जयंतीला सुट्या द्या!

Demand-for-a-public-holiday-on-the-birth-anniversaries-of-four-great-leaders : चार महापुरुषांच्या जयंतीला सार्वजनिक सुटीचा मागणी, विधानसभेत गाजला मुद्दा

Mehkar महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत वंचित व भटक्या समाजाच्या अस्मितेचा मुद्दा ठामपणे मांडला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यासह संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा आणि क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आ. खरात यांनी आपल्या भाषणात सरकारवर निशाणा साधत म्हटले की, राज्यपालांच्या अभिभाषणात महापुरुषांची नावे घेतली जातात; मात्र त्यांच्या विचारांवर चालण्याचा ठोस संकल्प शासनाच्या कृतीत दिसत नाही.

ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा आणि बिरसा मुंडा हे वंचित, भटक्या व आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करणे हा संबंधित समाजाचा हक्क आहे.

Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका

या चारही महापुरुषांच्या जयंती व विचारांमुळे संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळते, असे नमूद करत राज्य शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. खरात यांनी केली. दरम्यान, बंजारा, वंजारी तसेच आदिवासी बांधवांकडून या मागणीचे स्वागत होत असून, राज्य सरकार या विषयावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!