Turned down by BJP, yet become kingmakers : आशिष पवित्रकार, विजय इंगळे यांच्या विजयाने बदलले गणीत, सत्तासमीकरणांवर थेट परिणाम
Akola महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक धक्कादायक निकालांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथवून टाकली. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाने. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आशिष पवित्रकार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विजय इंगळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजप नेतृत्वाला थेट राजकीय आरसा दाखवून दिला आहे.
भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ‘नकार’ हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरवत त्यांनी स्थानिक प्रश्न, नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख अजेंडा पुढे ठेवला. प्रस्थापितांना थेट आव्हान देणाऱ्या या भूमिकेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिणामी, पवित्रकार यांनी प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक आघाडी घेत विजयाची पताका फडकावली.
Mayoral election : महापौरपदावरून महायुतीत खळबळ; ‘शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले नसते’
दुसरीकडे, उद्धवसेनेचे उमेदवार विजय इंगळे यांनीही जोरदार मुसंडी मारत भाजपच्या प्रभावाखालील प्रभागातच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. विशेष म्हणजे इंगळे कुटुंबीयांनी आतापर्यंत चार वेळा भाजपकडून, तर यंदा उद्धवसेनेकडून पाचव्यांदा6 महापालिकेत प्रवेश करत ‘विजयाची परंपरा’ कायम राखली आहे.
या दोन्ही विजयांचा थेट परिणाम महापालिकेतील सत्तासमीकरणांवर होणार असून, अपक्ष आणि उद्धवसेनेची भूमिका आता निर्णायक ठरण्याची चिन्हे yo आहेत. ‘नाकारलेले’ उमेदवारच विजयी ठरल्याने या निवडणुकीतून राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश मिळाला आहे—स्थानिक नेतृत्व, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कामाचा लेखाजोखा हाच मतदारांचा खरा निकष आहे.
Amravati Municipal Corporation : ‘आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला’;
स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन, मुद्देसूद प्रचार आणि जनतेशी थेट नाळ यामुळे विजय इंगळे यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. ‘पक्ष नव्हे, तर काम महत्त्वाचे’ हा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचला. या निकालामुळे भाजपच्या उमेदवार निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत पक्षाला मोजावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.








