State government will crack down on alcohol drinkers : विदेशी दारूच्या किमतींमध्ये १४ वर्षांपासून कुठलीही वाढ झालेली नाही
Nagpur : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लावण्यात आल्यावर दारूची दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्याचा परिणाम असा झाला की राज्य सरकारच्या महसुलात कमालिची तूट आली. त्यामुळे संपुर्ण लॉकडाऊन बंद होण्यापूर्वीच राज्यातील दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्याच्या तिजोरीत महसूल जमा होऊ लागला. तेव्हा सोशल मिडियावर तळीरामांना ‘राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा’ संबोधणारे मिम्स प्रचंड व्हायरल झाले होते.
कोरोना काळ आणि त्यानंतर विदेशी दारूच्या किमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. मात्र देशी दारूच्या किमतीमध्ये सन २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. विदेशी दारूच्या किमतींमध्ये सन २०११ पासून म्हणजे तब्बल १४ वर्षांपासून कुठलीही वाढ झालेली नाही. राज्य सरकारने देशी व विदेशी दारूच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तळीरामांची झिंग उतरणार असल्याचे बोलले जात आहे. पण दारूच्या किमती कितीही वाढल्या तरी विक्री कमी होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे तळीरामांची झिंग उतरणार की आणखी चढणार, हा प्रश्न सध्या चवीने चर्चीला जात आहे.
MP Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामं करा, खासदारांनी सुनावले
सरकारला आर्थिक अडचण आली की मोर्चा दारूकडे वळवला जातो, अशी चर्चा तळीरामांमध्ये असते. आताही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवल्यामुळे सरकार अडचणीत आल्याचे सांगितले जाते. त्यासाठी इतर विभागांचा निधी वळवल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. त्यानंतरही सरकारची आर्थिक तंगी कमी न झाल्यामुळे आता दारूच्या किमती वाढवल्या जाणार आहेत.
दारूच्या किमती वाढवण्याचा निर्णय सरकारने कालच्या (ता. १० जून) कॅबीनेट बैठकीत घेतला. या निर्णयाचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर जीआर काढला जाईल आणि वाढीव दर लागू होतील. यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होणार असली तरी तळीरामांसाठी ही बातमी दुःखद आहे.