Flat and two cafés come under the SIT scanner in the Amravati sexual exploitation case : डिलीट केलेला डेटा रिकव्हर झाल्यास मोठे खुलासे, कठोरा रोडवरील फ्लॅट तपासाचा केंद्रबिंदू
Amravati परतवाडा–अचलपूर परिसरात उघडकीस आलेल्या कथित व्हिडिओकांडाच्या तपासात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावतीतील कठोरा नाका परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटचा गैरवापर करून मुलींना तेथे नेल्याचे एसआयटी तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय शहरातील दोन कॅफेही आता तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.
एसआयटीने कठोरा नाका रोडवरील संबंधित फ्लॅटमध्ये जाऊन क्राईम सीन रिक्रिएशन केले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मानव सुगंधे या आरोपीने स्वतःच्या नावाने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यानंतर हा फ्लॅट अयान अहमदला वापरासाठी उपलब्ध करून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात फ्लॅट मालकाचीही चौकशी होणार आहे.
फ्लॅटप्रमाणेच अमरावती शहरातील दोन कॅफेंमध्येही आरोपीने मुलींना नेल्याचे तपासात उघड झाले आहे. या ठिकाणी अश्लील कृत्ये झाल्याचा संशय असून, संबंधित कॅफे चालकांची भूमिका तपासली जात आहे. यामुळे शहरातील तथाकथित ‘केबिन संस्कृती’ पुन्हा चर्चेत आली आहे.
School Education : भाजपचा दणका, खासगी शाळा बॅकफूटवर; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून आतापर्यंत आठ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो मिळाले आहेत. काही पीडिता अल्पवयीन असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वयेही गुन्हा नोंदविला आहे. जप्त केलेले लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्क आणि मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अयान अहमदसह उजेर खान, तबरेज खान आणि मोहम्मद साद यांना २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मानव सुगंधे, एहफाज खान, मोहम्मद इमरान आणि शेख नावेद यांना २३ एप्रिलपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.
Akola Municipal Corporation : भाजपच्या तक्रारीवरून शिंदेसेनेच्या नगरसेवकाला अटक; जामीन मिळाला, पण…
पोलिसांच्या मते, आरोपींनी काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. फॉरेन्सिक लॅबमधून डेटा पुनर्प्राप्त झाल्यास पीडितांची संख्या आणि आरोपींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत वेगाने सुरू आहे.








