Anti-Corruption bureau : सापळा रचला अन् ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

Assistant Registrar and Chief Clerk taken into custody : सहाय्यक निबंधक आणि मुख्य लिपिकला घेतले ताब्यात

Akola लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या पथकाने सहाय्यक निबंधक आणि मुख्य लिपिक या दोन शासकीय कर्मचाऱ्यांना ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंजनगाव सुर्जी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात करण्यात आली.

राजेश राजदेव यादव (५५ वर्षे), पद : सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अंजनगाव सुर्जी. गणेश नारायणराव कुकडे (३६ वर्षे), पद : मुख्य लिपिक, सहकारी संस्था, अंजनगाव सुर्जी, अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

BJP Government : सपकाळ म्हणाले, ‘सीधे रस्ते की ये टेढीसी चाल है..’

तक्रारदाराने ‘मधुराबाई गृहतारण सहकारी संस्था मर्या., भंडारज’ या संस्थेची नोंदणी करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र, नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी सहाय्यक निबंधक राजेश यादव यांनी तक्रारदाराकडून ७,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सुरुवातीला २,००० रुपये दिले आणि उर्वरित ५,००० रुपये नंतर देण्याचे मान्य केले.

Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!

तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी दरम्यान आरोपींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २८ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. यादरम्यान सहाय्यक निबंधक यादव यांनी ५,००० रुपये व मुख्य लिपिक कुकडे यांनी ३,००० रुपये पंचासमक्ष स्वीकारले. यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

Pakistani citizen : शिंदे म्हणतात १०७ पाकिस्तानी सापडत नाही, तर फडणवीसांचा वेगळाच दावा !

ही यशस्वी कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मारुती जगताप आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. मिलिंदकुमार बहाकर (पोलीस उपअधीक्षक) आणि त्यांचे सहकारी दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदीप तळे, किशोर पवार, निलेश शेगोकार, असलम शहा व चालक नफीस यांनी राबविली.