Official arrested for demanding bribe of Rs 50,000 for approval of Jowar Bill : २५ हजार रुपये घेताना एकाला अटक; पुरवठा अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल
Buldhana हमीभावाने विक्री केलेल्या ज्वारीचे बिल मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बुलढाणा पथकाने कारवाई केली आहे. ही रक्कम खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारली जात असताना ACBने सापळा रचत संबंधित खासगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात दोघांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शेतकऱ्याने ज्वारी हमीभाव केंद्रावर विकली होती. त्याचे देयक मंजूर करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे (वय ४०) यांनी थेट ७० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ५० हजारांवर आली. यातील पहिल्या हप्त्यातील २५ हजार रुपये खाजगी इसम देवानंद गंगाराम खंडाळे (वय ६२, रा. तानाजी नगर, बुलढाणा) यांच्या माध्यमातून स्वीकारले जात होत
शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर ACBने तातडीने पडताळणी सुरू केली.
Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन
२१, २२ व २३ जुलै २०२५ रोजी सखोल चौकशी आणि माहिती संकलन केल्यानंतर सापळा रचण्यात आला. २३ जुलै रोजी खंडाळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारले आणि त्या क्षणीच ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
खंडाळे हे सेवानिवृत्त लेखा पर्यवेक्षक असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या वतीने दलाल म्हणून कार्य करत होते. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सरकारी पदाचा गैरवापर, शेतकऱ्यांची फसवणूक आणि लाच मागणीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Amravati MIDC : कारखाने बंद झालेत, रोजगाराच्या संधीही घटल्या
ही संपूर्ण कारवाई ACBचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकात पोलिस निरीक्षक रमेश पवार, उपनिरीक्षक विलास गुंसीगे, तसेच शाम भांगे, प्रविण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शेळेश सोनवणे, गजानन गाल्डे, स्वाती वाणी व नितीन शेटे यांचा समावेश होता.