Anup Dhotre, Randhir Sawarkar : अकोला वैद्यकीय महाविद्यालयात तणाव कायम; लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतरही परिचारिका आंदोलनावर ठाम

akola-gmc-nurses-protest-mla-dispute-political-intervention : आरोग्य सेवेतील आधारस्तंभांना विनाकारण त्रास देऊ नये; रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन

Akola शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वादाचे पडसाद आता तीव्र आंदोलनात उमटू लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर, रुग्णालयातील परिचारिकांनी कामावर बहिष्कार टाकत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी विविध राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी देऊन या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक अद्याप आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

रुग्णालयातील पाहणीदरम्यान झालेल्या वादात परिचारिकांना उद्धट वागणूक मिळाल्याचा आरोप परिचारिका संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे परिचारिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत याप्रकरणी ठोस भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार परिचारिकांनी व्यक्त केला आहे.

Congress Vidarbha : महापालिका, नगरपालिकेत मोठा पराभव; आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार?

या वादात आता सत्ताधारी पक्षानेही उडी घेतली आहे. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिचारिकांशी चर्चा केली. आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर आणि परिचारिका हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून त्यांना कामाच्या ठिकाणी विनाकारण त्रास दिला जाऊ नये, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडताना रुग्णसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Vidarbha Farmers : कर्जमाफीची तयारी; ‘डेटा’ संकलनाला उद्याची डेडलाइन

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असले, तरी आंदोलनामुळे सर्वोपचार रुग्णालयातील दैनंदिन रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला रुग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी आहेत, तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या दोन टोकांच्या भूमिकेत सामान्य रुग्ण मात्र भरडला जात आहे.