Action taken against 108 Aaple Sarkar Seva Kendra centres : अनेक केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यरत नसल्याचे आढळल्याची नोंद
Akola डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व वेळेत मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC 2.0) योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर या केंद्रांचे जाळे उभारण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आणि ‘आधार सेवा केंद्रां’ची सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १०८ केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यरत नसल्याचे, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी असल्याचे तसेच नागरिकांना वेळेत सेवा न मिळाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले.
Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!
“प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळाली पाहिजे,” या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे सेवा केंद्रांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनियमितता आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ पुढील उपाययोजना केल्या आहेत:
सर्व सेवा केंद्रांवर QR कोड प्रणाली लागू
नागरिकांसाठी थेट तक्रार व अभिप्राय नोंदविण्याची डिजिटल सुविधा सुरू
हेल्पलाईन क्रमांक 080 6590 9844 उपलब्ध
सेवा केंद्रांवर नियमित देखरेख व मूल्यांकन प्रक्रिया सुरू








