व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ashish shelar : आशिष शेलारं यांनी काढली संजय राऊत यांची ‘औकात’

Ashish shelar : आशिष शेलारं यांनी काढली संजय राऊत यांची ‘औकात’

Angry after post tagged Amit Sha : ‘ ती ‘ पोस्ट अमित शहा यांना टॅग केल्यामुळे संतापले.

Mumbai : राज्यात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विषयावरून वाट पेटला आहे .यातच दोन्ही ठाकरे बंधू मराठी संदर्भातील मोर्चासाठी एकत्र येत आहेत. यावर भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत,यातच ठाकरे बंधूंच्या एक येण्यासंदर्भातील, एक पोस्ट खा. संजय राऊत यांनी अमित शहा यांना टॅग केल्याचे समोर आले. यासंदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली असून, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची औकात नाही असे म्हणले आहे.

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत. हे दोघेही पाच जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होणार आहेत. खा. संजय राऊत यांनी यासंदर्भातील घोषणा केली. यानंतर सत्ताधारी भाजपच्या गोटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

MNS Sandip Deshpande : ‘त्या’ ३८०० लोकांचं काय घेऊन बसलात ?

मोर्चा संदर्भात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे. मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यात मराठीची सक्ती आहे. भाजपा मराठीसाठी कट्टर आहे, मराठीसाठी आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकार मुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. कोणीही अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक गैरसमज पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे. मराठी भाषा अनिवार्य आहे हिंदी भाषा ऐच्छिक आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. यावर संजय राऊतांनी टीका केली आणि सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव पोपट आहे असे म्हटले होते. यावर शेलार यांनी भाष्य करताना म्हटले आहे की, सदावर्ते यांच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. अंतिमतः निर्णय पोलीस घेतील. चर्चेला आम्ही तयार आहोत. गैरसमजाचे बळी पडू नका,असा सल्ला ही आशिष शेलार यांनी दिला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेली आहे आणि त्यातला हिंदी भाषेबाबतचा आयोगाच्या तज्ज्ञांचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. राज ठाकरे यांच्या पक्षालाही आमचे म्हणणे आहे की, काँग्रेसने यावर निर्णय घेतलेला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या या निर्णयाला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता याकडे शेलार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Dr. Rajendra Shingne : पराभवाने खचून जाऊ नका, नव्याने तयारीला लागा!

संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते, त्यानंतर लगेच त्यांनी इंग्रजीत दुसरे ट्विट करत थेट केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. जय महाराष्ट्र म्हणत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल, ठाकरे हे ब्रँड आहेत, असे पोस्टमध्ये म्हटले होते. याशिवाय राऊत कायम मोदी आणि शहांवर थेट टीका करतात. यावर शेलार यांनी संजय राऊत यांची औकात नाही असे म्हणले आहे.

error: Content is protected !!