Ashok kharat case : तीन एफआयआर मधून समोर आली लैंगिक शोषण, अघोरी कृत्यांची भीषण मालिका

ashok-kharat-crime-case-nashik-3-fir-shocking-details-marathi-news : भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Nashik : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण आणि अघोरी विधींच्या नावाखाली अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, प्रत्येक तक्रारीतून विकृत आणि भयावह स्वरूप उघड होत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक कार्यरत असून आयकर विभागानेही यात प्रवेश करत आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार, धमकी देणे तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात 2022 ते 2025 या कालावधीत एका महिलेला धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा खोटा आव आणत, “मी कृष्णाचा अवतार असून तू मागील जन्मातील माझी राधा आहेस” असे सांगून महिलेला मानसिकदृष्ट्या प्रभावित केले जात होते. कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ देणे, पतीला बाहेर थांबवणे आणि अघोरी पूजाविधीच्या नावाखाली अत्याचार करणे असे प्रकार या तक्रारीत नमूद आहेत. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर दबाव आणला जात होता.

Lpg gas cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठा बदल

दुसऱ्या गुन्ह्यात गर्भवती महिलेला लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलगा होण्याचे आमिष दाखवत पूजाविधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेला तसेच तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही नमूद आहे. नकली साप, वाघाचे कातडे यांसारख्या वस्तूंचा वापर करून भीती निर्माण केली जात होती. धार्मिक भावना भडकवत आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेला सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

तिसऱ्या गुन्ह्यात एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. संसारातील अडचणी दूर होतील, जीवनात शुभ काळ येईल असे सांगत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. स्वतःला अवतारी पुरुष असल्याचे भासवत आणि त्रिकाळ ज्ञान असल्याचा दावा करत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार आहे. महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर तिला गर्भपातासाठी औषध देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच तिच्या मुलांबाबत भीती दाखवून तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Datta meghe : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.