Breaking

Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

Bachchu Kadu acquitted in case of altercation with police officer : पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचे प्रकरण, निर्दोष मुक्तता

Amravati अचलपूर विधानसभेचे माजी आमदार बच्चू कडू व त्यांच्या चार सहकाऱ्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलिस कर्मचारी इंद्रजित चौधरी यांच्यावर हल्ला करणे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश आर. बी. रेहपाडे यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्त केले.

२३ एप्रिल २०१६ रोजी परतवाडा येथील एस.टी. डेपोसमोर पोलिस कर्मचारी इंद्रजित चौधरी यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू, अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख व धीरज निकम यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी परतवाडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, १८६, ३३२, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात यापूर्वी प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने चौघांना शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात ॲड. महेश देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले.

Dharmarao Atram : आत्राम म्हणतात, भाजपनेच महायुतीचा धर्म मोडला

१६ मे रोजी झालेल्या अंतिम युक्तिवादात कर्मचारी नशेत होता, हे अनेक साक्षीदारांच्या जबाबांमधून व परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे स्पष्ट झाले असून, हे घटक कनिष्ठ न्यायालयाने दुर्लक्षित केल्याचे युक्तिवादात अधोरेखित करण्यात आले. युक्तिवादात ॲड. महेश देशमुख यांना ॲड. सय्यद करीम, ॲड. आशिष देशमुख व ॲड. चैतन्य खारोडे यांचे सहकार्य लाभले.

Praful Patel : टाईट कपडे घालून चालणार नाही, पक्ष वाढवावा लागेल

संपूर्ण युक्तिवाद आणि साक्षीपुराव्याच्या आधारे, न्यायालयाने चौघेही आरोपी निर्दोष असल्याचे मान्य करून त्यांची मुक्तता केली. या निकालामुळे बच्चू कडू समर्थकांतून समाधान व्यक्त होत आहे.