Breaking

Bacchu kadu meets Raj Thackarey : राज ठाकरे दिसणार कर्जमाफी यात्रेत? बच्चू कडूंचे निमंत्रण

MNS will support Prahar’s protest for farmers’ loan waiver : मुंबईत झाली बैठक; शेतकरी आंदोलनाची दिशा व धोरणांवर चर्चा

Mumbai महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. बच्चू कडू यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मनसेचा या यात्रेला पाठिंबा असला तरीही आता राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतर्थ निवासस्थानी बच्चू कडू यांनी भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना औपचारिक आमंत्रण दिले. या यात्रेमुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना बलकटी मिळणार आहे. शासनाच्या दुर्लक्षाविरोधात निर्णायक आवाज उठवला जाईल, असे कडू यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी या आमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरीही प्रत्यक्षात ते जाणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेत पाणंद रस्ते विकासासाठी मास्टर प्लान!

शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने या लढ्यात सहभागी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील शेतकरी समस्यांवर उपाययोजना व आगामी आंदोलनाच्या रणनीतीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या संभाव्य आंदोलनाची दिशा, मागण्या व कार्यक्रम आखणीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कर्जमाफी, अपुऱ्या विमा भरपाईसह अन्य ज्वलंत प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ भाषणांपुरते न ठेवता रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Ward structure in final stage : अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ जागांवरच निवडणूक

या बैठकीत शेतकरी आत्महत्या, पिकविमा, हमीभाव, सिंचनाच्या सुविधा यासारख्या मुद्यांवर चर्चा झाली. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढत दोन्ही नेत्यांनी शेतकरी कल्याणासाठी एकत्र येऊन लढण्याची भूमिका मांडली. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या प्रश्नांकडे केवळ घोषणांच्या माध्यमातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून पाहिले पाहिजे, असा ठाम संदेश या भेटीतून देण्यात आला. येत्या काळात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची ही भेट त्याचे प्रारंभिक संकेत मानले जात आहेत.