Breaking

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनात उतरणार मनसे!

MNS will join Bachchu Kadu’s protest : ‘७/१२ कोरा’ यात्रेला पाठिंबा; बाळा नांदगावकर सहभागी होणार

Amravati  मराठी भाषेसाठी लढा दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या ‘सातबारा कोरा यात्रा’ला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर Bala Nandgaokar हे गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होत आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरु असून, बाळा नांदगावकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती प्रहार पक्षातर्फे देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे हक्क राखण्यासाठी ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ या घोषणेने ही यात्रा ७ जुलै रोजी देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ येथून सुरू झाली आहे. उंबर्डा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज ही गावे पार करून, ही यात्रा स्व. साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण या गावी पोहोचणार आहे. हे गाव राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झालेलं ठिकाण आहे.

Uddhav Balasaheb Thackarey : खते-बियाण्यांची दरवाढ; शेतकरी अडचणीत!

या सुमारे १३८ किलोमीटरच्या पदयात्रेत विविध पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. १४ जुलै रोजी चिलगव्हाण येथे भव्य सांगता सभा होणार आहे. त्याआधी १४ जुलैलाच अंभोऱ्यात होणाऱ्या सभेसाठी ‘रिकाम्या हाताने नका येऊ, रूमने आणि लाठ्या-काठ्या घेऊन या’ असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित सभेत बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, “आता घोषणा पुरेशा नाहीत, कृती हवी. सरकारला वठणीवर आणायचं असेल, तर रस्त्यावर उतरावं लागेल, निर्धाराने आणि ताकदीने.”

Vidarbha Farmers : ७७५६ शेतकरी सन्मान निधीपासून वंचित!

“वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे देव होते. त्यांनी रोजगार हमी योजनेद्वारे लाखो गरिबांना पोटभर अन्न दिलं. पण आज त्यांच्याच वारशाचा अपमान होतो आहे. शेतकऱ्यांचं पाणी बंद, वीज बंद, अनुदान थांबले, विमा कंपन्यांच्या लुटीला संरक्षण दिलं जातं. हे सहन करायचं असेल, तर आम्ही मरेपर्यंत शांत बसू, पण आम्ही जगायचं ठरवलंय. लढून, झुंजून आणि सरकारला गुडघ्यावर आणूनच ही यात्रा थांबेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.