व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu Kadu : भाजपसोबतच्या वादामुळे बच्चू कडूंचा टोकाचा निर्णय

Bacchu Kadu : भाजपसोबतच्या वादामुळे बच्चू कडूंचा टोकाचा निर्णय

Resignation from the post of Chairman of Ministry of Disability Welfare Mission : दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्षपद सोडले

Amravati जिल्ह्यात बच्चू कडू यांचे पहिले आमदार रवी राणा यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासोबत वाद झाले. या वादानंतर भाजपसोबत जुळवून घेण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे अखेर बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्षपद सोडले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. अद्याप दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनित राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी काम केले. त्यानंतर आमदार रवी राणांचा विरोध केला. आता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या सोबत त्यांचा वाद झाला. या सर्वांचा परिपाक म्हणजे बच्चू कडू यांनी नाराज होऊन दिलेला राजीनामा होय. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजीनामा देताना बच्चू कडू यांनी मंत्रालयाचे काम सुरू झालेले नाही, असे कारण दिले. त्यामुळे पदावर राहून हे काम होण्याची शक्यता वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Dakshin Express Incident : मजुराचा रेल्वे प्रवास ठरला अखेरचा !

बेईमानी मान्य नाही
दिव्यांगांसोबत बेईमानी मला मान्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अशी अनेक कारणं त्यांनी पुढे केली आहे. बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बच्चू कडू यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. तो मंजूर करून आपल्याला असलेली सुरक्षासुद्धा काढून टाकावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

आता उपसणार आंदोलनाचे हत्यार
मंत्रालय निर्माण झाले. कामकाजाचा पत्ता नाही. इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे. तेही वेळेवर कधीच मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था पाच टक्के निधी खर्च करत नाही. अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिवपण नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही. पदभरती नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, असं माजी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यभर दिव्यांगांचे आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!