Weakening ally parties is the BJP’s agenda : मुंबईतील जागावाटपावरून बच्चू कडूंची टीका
Amravati माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर तीव्र टीका करताना म्हटले की, “भाजपचा एकंदरित अजेंडा हा मित्रपक्षांना सोबत घेतल्याचे भासवून त्यांचे खच्चीकरण करण्याचा आहे. आतापर्यंत भाजपने ज्या मित्रपक्षांना पुढे केले, त्यांना शेवटी संपवलेच. जसे वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला, तसे भाजपही मित्रपक्षांच्या डोक्यावर पाय ठेवत स्वतःचा अजेंडा राबवते.”
कडू म्हणाले, “मुंबईतील बहुतेक जागा भाजप दाबून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रपक्षांची राजकीय ताकद कमी करण्याचा हेतू आहे. मित्रपक्षांनी सावध राहिले पाहिजे. एकवेळ विरोधकांच्या हाती सत्ता गेली तरी चालेल; पण भाजप असा एकतर्फी व्यवहार करत असेल, तर तशाच पद्धतीने उत्तर देणे आवश्यक आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही सारखेच, काँग्रेसनेही भ्रष्टाचार केला नाही असे नाही.”
Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!
निवडणुकांच्या बदलत्या स्वरूपावर बोलताना कडू म्हणाले, “निवडणूक ही मुद्द्यांवर लढवली जाण्याची प्रथा संपली आहे. निवडणुका आता धार्मिक युद्धासारख्या झाल्या आहेत. प्रभाग पातळीवरही जाती-धर्मांच्या आधारावर ध्रुवीकरण वाढले आहे. लोकशाहीतील मतदान हा विकासापासून आणि मुद्द्यांपासून दूर गेला आहे, जे देशासाठी धोकादायक आहे.”
ते पुढे म्हणाले, “गुणी कार्यकर्त्यांचे कौतुक केवळ १० टक्के लोक करतात; तर पैसा खर्च करणाऱ्यांच्या मागे ९० टक्के लोक जातात, असे चित्र निर्माण झाले आहे. काही जातींना फार कमी मतसंख्या असते, तरी त्यांचे उमेदवार जिंकतात, परंतु त्यासाठी ते प्रचंड मेहनत करतात. अनेकांकडून ती मेहनत होत नसल्याने जनता पुन्हा जाती-धर्मांकडे वळते.”
Local Body Elections : बुलढाणा पालिकेत चौरंगी लढत! गायकवाड–शिंदे यांची ‘घराणेशाही’ आमनेसामने
राजकीय प्रक्रिया आणि घराणेशाहीवरही कडू यांनी स्पष्ट शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “‘ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे’ असे सांगून कार्यकर्त्यांना भावनिक केले जाते, परंतु प्रत्यक्षात उमेदवारी मात्र नेत्यांच्या नातलगांना दिली जाते. पक्षनिष्ठ लोकांची वैचारिक बांधिलकी सुटली आहे. कोणीही उमेदवार दिला तरी त्याचेच गुणगान करण्यात येते.”








