MNS and BJP face-off : जनतेची दिशाभूल करणारी बॅनरबाजी सुरू असल्याचा मनसेचा आरोप
Thane ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने लावलेल्या ‘नमो भारत, नमो ठाणे’ या बॅनरवरून राजकीय वातावरण तापले आहे. या बॅनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून ठाण्यातील जनतेला आवाहन करण्यात आले आहे. मात्र या घोषणेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर टीका करताना हे बॅनर जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या बॅनरवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भाजपवर हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, ठाणेकरांसमोर ‘नमो ठाणे’ अशी घोषणा देऊन फसवले जात आहे. ठाणेकरांना विकास हवा आहे, रोजगार हवा आहे, पायाभूत सुविधा हव्या आहेत, मात्र भाजप केवळ घोषणाबाजी करत आहे. त्यांनी भाजपला आव्हान दिले की, ठाण्यातील जनतेला खऱ्या अर्थाने दिलासा देणारे काम दाखवावे. जाधव यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या प्रश्नांचा उल्लेख करून भाजपवर टीका केली.
Jain Muni Nileshchandra : अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ
शिवसेना (उबाठा) गटानेही या बॅनरवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने म्हटले की, ठाणेकरांना ‘नमो ठाणे’ म्हणणे म्हणजे स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे होय. भाजपने ठाण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने भाजपला विचारले की, ठाण्यातील पाणीटंचाई, रस्त्यांची समस्या, आरोग्य सुविधा यावर काय उपाययोजना केल्या आहेत.
या बॅनरमुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून केदार दिघे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक बॅनर झळकवलं आहे. ज्यात “ठाणे फक्त बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे” असं स्पष्ट शब्दांत सांगण्यात आलंय. (https://x.com/MiKedarDighe) तर दुसरीकडे “टॅंकरनी पाणी भरतोय आणि नगरसेवकांची पोटं भरतो! मौन भारत, मौन ठाणे” अशाप्रकारचे बॅनर्स झळकावून नमो ठाणेला आव्हान दिलेलं आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील महापालिका निवडणुकीत वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. भाजपने राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी स्थानिक प्रश्नांवर विरोधकांनी त्यांना घेरले आहे. मनसे आणि शिवसेना (उबाठा) गटाने भाजपला ठाण्यातील जनतेसमोर उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.








