व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Baramati bypoll : बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापले

Baramati bypoll : बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापले

baramati-bypoll-devendra-fadnavis-appeal-unopposed-election-sunetra-pawar : काँग्रेसच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे बिनविरोध निवडणुकीचे आवाहन

Mumbai : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले असून काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली. यापूर्वीही महाराष्ट्रात अशा प्रकारे पोटनिवडणुका बिनविरोध झाल्याचा दाखला देत त्यांनी आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची आठवण करून दिली. सुनेत्रा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान काँग्रेसने बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी झाली आहे. काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आल्यास बारामतीत थेट लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत !

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत पाठिंबा मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे झालेल्या भीषण अपघाताबद्दलही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित कुटुंबाला मदत जाहीर करण्यात आली असून अशा प्रकारच्या रस्त्यालगत असलेल्या विहिरींचे तात्काळ ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Bondre : काँग्रेस माझ्या रक्तात आहे, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही

फडणवीस यांनी सांगितले की, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीभोवती योग्य संरक्षण व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात गंभीर ठरला. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!