Breaking

Bhandara Police : देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूसे जप्त

Two live cartridges along with country-made pistol seized : एकाला अटक, दुसरा फरार; 4.31, लाखांचा मुद्देमाल सापडला

Bhandara तुमसर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी सध्या फरार आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोंदिया रोडवरील खापा चौकाजवळ कारवाई केली. शेवरोलेट कंपनीच्या टवेरा (MH 40 AR 2962) या वाहनाची झडती घेतली असता देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली.

तुमसर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन संशयित आरोपी गोंदिया रोडमार्गे अवैध शस्त्र घेऊन जात असल्याचे समजले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रविन सपाम यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तातडीने कारवाई करत गाडी थांबवली. झडती दरम्यान, सुमित संजय सीनवाने (21, रा. पवनी, ता. रामटेक, जि. नागपूर) याला अटक करण्यात आली. मात्र, त्याचा साथीदार शैलेश कड़वे (35, रा. बोबीषा पालोरा, ता. रामटेक, जि. नागपूर) हा कारवाईदरम्यान फरार झाला.

MLA Sanjay Puram : वाघ नदी पुलावर होऊ शकतो मोठा अपघात!

या कारवाईत एकूण 4.31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये देशी कट्टा (30 हजार रुपये), दोन जिवंत काडतुसे (1000 रुपये), तवेरा वाहन (4 लाख रुपये) व इतर महागडे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींवर कलम ३/२५, २० भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, हे आरोपी IPL सट्टा बाजाराशी संबंधित असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तुमसर व खापा येथे एका खानावळीत सट्टा व्यवहारासाठी आले होते. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

प्राथमिक तपासात आरोपी हे शस्त्र विक्रीसाठी घेऊन जात होते की अन्य कुठल्या मोठ्या कटाचा भाग होते? याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. तुमसर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसांपासून अवैध शस्त्र पुरवठ्याचे रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी या दिशेने तपास वेगाने सुरू केला आहे.

Vanchit Bahujan Aghadi : बोधगयाच्या मुद्यावर वंचित आघाडीही आक्रमक!

फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, पोलिसांनी गिरड परिसरातून फरार आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. तो पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत तुमसर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस यंत्रणेकडे वचक नसल्याने गुन्हेगार निडर झाले आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून, अवैध शस्त्र तस्करीमागील मोठे मास्टरमाइंड कोण, याचा छडा लावण्याची गरज आहे.