All the BJP functionaries of West Vidarbha in Akola for one day : बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष, निवडणुकीची पार्श्वभूमी
Akola पश्चिम विदर्भात आकाश फुंडकर, डॉ. अशोक उईके यांच्या निमित्ताने दोन मंत्री आहेत. शिवाय भाजपची मोठी फळी या भागात काम करत आहे. विधानसभा निकालानंतर चांगलं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वपूर्ण ठरत आहे. या बैठकीसाठी पश्चिम विदर्भातील अख्खे पदाधिकारी एक दिवस अकोल्यात असणार आहेत.
पश्चिम विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संघटन पर्व अंतर्गत 13 फेब्रुवारी रोजी सिटी स्पोर्ट, मूर्तिजापूर रोड, अकोला येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. या बैठकीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
Justice Bhushan Gawai : दुर्गम भागात न्याय पोहोचविण्याचे उद्दिष्ट
या बैठकीला पश्चिम विदर्भातील 1000 हून अधिक भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा व मंडळ स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, युवा मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान आघाडी, तसेच जिल्हा सदस्यता प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बैठकीस पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार अनिल बोंडे, आमदार चैनसुख संचेती, श्वेता महाले, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, प्रताप अडसड, माजी मंत्री प्रवीण पोटे, सचिन देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने, माधव मानकर, अंबादास उमाळे, देवाशिष काकड, रमेश अल्करी, आम्रपाली उपरवट, सुमनताई गावंडे, वैशालीताई निकम, चंदाताई शर्मा, डॉक्टर अमित कावरे, अशोक राठोड, एड. सुभाषसिंग ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या बैठकीत आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रमांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, पक्षबांधणी व आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.