BJP OBC wing : डॉ. रणजीत पाटलांचे काम केल्यामुळे डावलले, हा आरोप निराधार

Allegation of being sidelined for working under Dr. Ranjit Patil is baseless : तर माझ्यावरही कारवाई झाली असती, भाजप ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षाचा दावा

Akola भाजपकडून नुकतेच निलंबित करण्यात आलेले माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी एका सभेत भारतीय जनता पक्षाविरोधात आरोप करताना, “डॉ. रणजीत पाटील यांच्यासाठी पदवीधर मतदारसंघात काम केले म्हणून स्थानिक नेत्यांनी मला पक्षातून निलंबित केले,” असा दावा केला होता. मात्र हा आरोप पूर्णतः चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे भाजप ओबीसी आघाडीचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनिष गावंडे यांनी स्पष्ट केले आहे.

मनिष गावंडे म्हणाले की, “मी स्वतः पदवीधर निवडणुकीत डॉ. रणजीत पाटील यांचे सक्रियपणे काम केले होते. तसेच मतमोजणीदरम्यान मी त्यांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. जर केवळ पदवीधर निवडणुकीत काम केल्यामुळेच आशिष पवित्रकार यांना पक्षाने निलंबित केले असते, तर तशीच कारवाई माझ्यावरही झाली असती.”

Devendra Fadnavis : देवाभाऊ! अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार

ते पुढे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरजी सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. पदवीधर प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदी तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे केलेल्या पक्षकार्याची दखल घेत, अलीकडेच भाजप ओबीसी आघाडीच्या अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे.

Primary Health Centre : कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याची ‘एमओ’कडून आर्थिक लूट!

“भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्ह्यातील नेतृत्व नेहमीच निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांनी पक्षाने आपल्यावर कारवाई का केली, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे,” असेही गावंडे यांनी नमूद केले.

“अकोल्यात काँग्रेसचा आमदार कोणी निवडून आणला, याची जाणीव जनतेला आहे. जनता सुज्ञ आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेईल,” असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष (ओबीसी आघाडी) मनिष गावंडे यांनी व्यक्त केला.