Breaking

Gondia Zilla Parishad जिल्हा परिषद अध्यक्षाचा फैसला १८ जानेवारीला !

BJP will decide President’s post candidate on January 18 Everyone’s attention was drawn to the meeting : नावे निश्चित करणे व समन्वयाची जबाबदारी आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे

Gondia गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपने येत्या १८ जानेवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपचे आमदार व पदाधिकारी अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने १८ जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. कारण याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी 24 जानेवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी घोषणा केली आहे. या निवडणुकीसोबतच, पंचायत समिती सभापतिपदासाठी 20 जानेवारीला निवडणूक होणार आहे. भाजपचे नेते व पदाधिकारी 18 जानेवारीला बैठक घेऊन या पदांसाठी नावे निश्चित करणार आहेत. जिल्ह्यातील चारही आमदारांचे मत जाणून घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

Illegal Gender identification tests reduced : गुड न्यूज..! बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाच्या तक्रारी कमी झाल्या ! 

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण झाला होता. विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका झाल्या नव्हत्या. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर केली आहे. 20 जानेवारीला पंचायत समिती सभापतिपदासाठी तर 24 जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

भाजपचे दोनदिवसीय अधिवेशन शिर्डीत पार पडले. या अधिवेशनाला जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. 18 जानेवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे ज्यामध्ये नावांवर चर्चा करून ती नावे नागपूर येथील वरिष्ठ नेत्यांकडे पाठविली जाणार आहेत.

Sonam Wangchuk : सिमेंटची नव्हे मातीची घरे बांधा !

आमदार परिणय फुके यांच्याकडे नावे निश्चित करणे व समन्वयाची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील चारही आमदारांचे मत जाणून घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे, त्यामुळे आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. अध्यक्षपदासाठी काही नावांची सध्या चर्चा सुरू आहे, पण जी नावे चर्चेत असतात ती अंतिम क्षणी वगळली जातात हा आजवरचा अनुभव आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. विधानसभा निवडणूक काळात गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे सर्व सदस्य भाजपमय झाल्याने आता भाजपची संख्या वाढली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पद नको, अशी भूमिका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.