BMC Election 2026 : ‘देवेंद्र-रवींद्र’ जोडीने केली कमाल, विरोधकांना केले भुईसपाट

Devendra Fadnavis & Ravindra Chavhan make the win easy : मायक्रो प्लानिंग ठरले यशस्वी, ठाकरे कुटुंब २५ वर्षांनंतर सत्तेबाहेर

Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला असून या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. महापालिका निवडणुकीचे निकाल राज्यभरात १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले आणि भाजपने २९ पैकी २४ महापालिकांवर सत्ता मिळवून एक प्रचंड विजय संपादन केला आहे, ज्यामुळे त्यांचे शहरी प्रशासनातील वर्चस्व अधिक दृढ झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशाबद्दल पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा विजय भाजप आणि महायुतीची जनतेने दिलेली अभूतपूर्व मान्यता आहे आणि सर्वात जास्त जागा जिंकण्याची कामगिरी पक्षाने या निवडणुकीत केली आहे. त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि यशामागे कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांनी कार्यकर्ते व विजयी उमेदवारांना सांगितले की उन्माद करु नका.

Devendra Fadnavis BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना हवंय महापौरपद? काय म्हणाले शिंदे?

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडून काढली. फडणवीस यांची निर्णायक रणनीती आणि प्रचार मोहिमेमुळे विरोधकांना पळता भुई थोडी झाले. भाजपच्या विजयात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेतृत्व, संघटनात्मक मजबुती, प्रचार धोरणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेला भर निर्नायक ठरला.

Santosh Dhuri : कुटुंब एकत्र येऊनही फायदा झाला नाही

त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी देखील या निवडणुकीसाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. विजयानंतर फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांना फोन करुन त्यांचे अभिनंदन केले. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तिकीट वाटपासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत अत्यंत संयतपणे या जोडीने काम केले आहे. २९ महानगरपालिकांमध्ये २८६९ नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्यामध्ये भाजपचे १४३८ नगरसेवक आहेत. हा या जोडीचा करिष्माच म्हणावा लागणार आहे.