Bmc election : ठाकरे बंधूंची मराठी मतदारांवर भिस्त, तर…

BJP special strategy to unite the Amarathi vote bank : अमराठी व्होटबँक एकत्र करण्यासाठी भाजपची खास रणनिती

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणून आपलाच महापौर बसवायचा, असा निर्धार भाजपने केल्याचे स्पष्ट होत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूने वळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढली असून त्यात अमराठी मतदारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मराठी मतदारांची संख्या पूर्वीसारखी प्रभावी राहिलेली नाही. मात्र, मराठी मतदार जर एकवटून ठाकरे बंधूंच्या बाजूने उभे राहिले, तर त्याला तोल देण्यासाठी मुंबईतील अमराठी व्होटबँक आपल्या बाजूने भक्कमपणे उभी राहावी, यासाठी भाजपने स्वतंत्र आणि सखोल रणनीती आखल्याचे समोर येत आहे.

Municipal election : मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर गंभीर आरोप

या रणनीतीनुसार, मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज थेट ग्राऊंड लेव्हलवर उतरवली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र आणि बुथ स्तरावर संघाची ताकद भाजपच्या प्रचारासाठी वापरली जाणार असून घराघरात पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, ‘ब्रँड ठाकरे’ला थेट शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुंबईत सहा मोठ्या सभा घेणार असल्याची माहिती आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीस मुंबईत तळ ठोकून राहण्याची शक्यता असून, प्रचारयंत्रणा स्वतः हाताळण्यावर त्यांचा भर असणार आहे.

भाजपसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील अमराठी व्होटबँक. ही मतदारसंख्या एकत्र आणण्यासाठी भाजप हिंदुत्वाचा आक्रमक अजेंडा पुढे आणण्याची शक्यता आहे. अमराठी मतदारांमध्ये हिंदुत्वाचे राजकारण प्रभावी ठरते, असा भाजपचा अंदाज आहे. त्यामुळे नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांसारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी उतरवले जाणार आहे. याशिवाय, उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून खास पाच उत्तर भारतीय चेहरे मुंबईत प्रचारासाठी आणले जाणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, रवी किशन आणि निरुहा यांचा समावेश आहे. हे नेते मुंबईतील अमराठी आणि उत्तर भारतीय मतदारबहुल भागांमध्ये प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपसोबत युतीत निवडणूक लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मायक्रो-प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शाखाप्रमुखांना प्रत्येक घरात जाऊन प्रचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, त्यासाठी ‘लक्ष्यवेध’ या ॲपचा प्रभावी वापर केला जात आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, त्यांचा कल जाणून घेणे आणि मतदानाच्या दिवशी मतदार बाहेर पडेल याची खबरदारी घेणे, यावर शिंदे गटाचा भर आहे.

याशिवाय, मतदानाला येऊ न शकणाऱ्या वृद्ध मतदारांवरही शिंदे गटाची विशेष नजर आहे. या मतदारांची पोस्टल मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते ग्राऊंड लेव्हलवर विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून ठाकरे गटात, निवडणूक होताच शिंदे गटात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग आणि रंगत येणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजपासून मुंबईतील विविध शाखांना भेटी देऊन प्रचाराची सुरुवात करणार आहेत. आज ते शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग परिसरातील प्रभाग क्रमांक २०४ मधील शाखेला भेट देणार असून त्यानंतर वरळीतील शाखेत जाणार आहेत. उद्धव ठाकरे एकूण बारा शाखांना भेट देणार आहेत, तर राज आणि उद्धव ठाकरे चार ते पाच शाखांमध्ये एकत्र फिरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विक्रोळी येथे राज आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार असून, या सभेकडे संपूर्ण मुंबईचे राजकीय लक्ष लागले आहे.