BMC Elections : राज्यात हल्ल्यांची साखळी सुरुच; शिंदे गटाच्या उमेदवारावर हल्ला

Attack on a candidate from the Eknath Shinde faction : मुंबईतील वांद्रे परिसरातील घटना, हल्ल्याचे कारण अस्पष्ट

Mumbai नुकताच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला होता. तसेच दहिसरमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारावर हल्ला केला. या घटना ताज्या असतानाच मुंबईतील वांद्रे परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

शिंदे गटाचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला. एका अज्ञात इसमाने हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू भोसकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुरेशी मुंबईत वॉर्ड क्रमांक ९२ मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी हाजी सालिन कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाला बसणार धक्का? माजी आमदार दगडू सकपाळ शिंदेंना भेटले

या प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात थेट सामना होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून हाजी कुरेशी उमेदवार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अरुण कांबळे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या वतीने इब्राहिम कुरेशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून युसूफ माडी, समाजवादी पार्टीचे शबाना वकील खान हे आपलं नशीब आजमावत आहेत.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांनी गुजराती शाकाहारी ब्रँड प्यायली आहे

आता हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला याचे तपशील समोर आलेले नाहीत. हा हल्ला राजकीय हेतुने झाला आहे की वैयक्तिक कारणासाठी झाला याबाबत अधिक तपास सुरु आहेत. मात्र निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर असे हल्ले होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत मांडले जात आहे.