Budget 2026 : नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणन !

Morarji Desai holds record for presenting budget the most times : सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर

New Delhi : देशाचं लक्ष लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण प्रक्रिया सुरू झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडत आहेत. यंदा विशेष बाब म्हणजे रविवारी अर्थसंकल्प सादर केला जात असून नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सलग नवव्यांदा निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.

1या अर्थसंकल्पाकडे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष केंद्रीत झाले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील लांबलेला व्यापारी करार, अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेले टॅरिफ, तसेच जागतिक स्तरावर वाढलेली आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरता या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल वेगाने सुरू ठेवण्यासाठी या अर्थसंकल्पातून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nitin deshmukh: सत्तेसाठी तत्वांशी तडजोड; काँग्रेस नगरसेवकांच्या जातीवाचक वक्तव्यांवर ठाकरेंचे आमदार गप्प का?

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावरच केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. आतापर्यंत त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट मिळून एकूण आठ वेळा अर्थसंकल्प सादर केले असून यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांचा नववा अर्थसंकल्प असेल.

देशाच्या संसदीय इतिहासात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात ही जबाबदारी पार पाडली आहे. तर प्रणव मुखर्जी यांनीही विविध सरकारांच्या काळात आठ वेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. मात्र एकाच पंतप्रधानांच्या कार्यकाळात सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान निर्मला सीतारमण यांना मिळाला आहे.

Mahayuti government: जिल्ह्यातील नऊ आमदारांना विकासकामांसाठी मिळाले २७ कोटी

दरम्यान, भारताचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 या कालावधीत सहा वेळा आणि 1967 ते 1969 या कालावधीत चार वेळा असे एकूण दहा वेळा अर्थसंकल्प सादर केले होते. जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना त्यांनी हा विक्रम प्रस्थापित केला. नवव्या अर्थसंकल्पासह निर्मला सीतारमण या विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचणार असून देशाच्या आर्थिक इतिहासात त्यांचे नाव महत्त्वाने नोंदवले जाणार आहे.