Buldhana sports complex : निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा, तरीही क्रीडा संकुलाचे ‘मैदान’ रिकामेच!

buldhana-sports-complex-work-stalled-even-after-announcement-inelection-campaign : सिंथेटिक ट्रॅकसह अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीचे काम सुरूच झाले नाही

Buldhana क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्यातील बहुप्रतिक्षित क्रीडा संकुलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला असून, सिंथेटिक ट्रॅकसह विविध अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. निवडणुकीच्या काळात या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात टेंडर प्रक्रियाही पूर्ण न झाल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बुलढाणा शहरातील क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक, खेळाडूंसाठी आधुनिक प्रशिक्षण सुविधा तसेच इतर आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला होता. मात्र या कामाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे असणार, यावरच दीर्घकाळ संभ्रम निर्माण झाला. विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पाची गती मंदावली आणि अखेर काम कागदोपत्रीच अडकून राहिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

APMC : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा

बुलढाणा जिल्ह्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडले असून शहराला ‘क्रीडानगरी’ अशी ओळख मिळाली आहे. मात्र अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्राकडे राजकीय पातळीवर अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत खेळाडू आणि क्रीडा संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. काही मोजक्या खेळांना अपवाद वगळता इतर क्रीडा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रश्नावर यापूर्वी पुढाकार घेतला होता. स्थानिक खेळाडूंच्या समस्या लक्षात घेऊन क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींमुळे क्रीडामंत्रिपदात झालेल्या बदलानंतर हा विषय पुन्हा मागे पडल्याचे बोलले जात आहे.

NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप

आता जिल्ह्याचे पालकमंत्री ‘आबा’ यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याची माहिती पुढे येत असल्याने क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार का, याकडे क्रीडाप्रेमी आणि तरुण खेळाडूंचे लक्ष लागले आहे. घोषणा आणि प्रत्यक्ष काम यातील दरी भरून काढत क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.