व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bunty kukade attacks Prafulla gudadhe: गुडधे यांनी आधी काँग्रेसच्या बुडत्या दुकानाची चिंता...

Bunty kukade attacks Prafulla gudadhe: गुडधे यांनी आधी काँग्रेसच्या बुडत्या दुकानाची चिंता करावी, भाजप नेत्याचे उत्तर

Why are OBC leaders leaving the party? BJP leader Bunty Kukde questions the Congress : ओबीसी नेते पक्ष का सोडून चालले?
भाजपचे बंटी कुकडे यांचा काँग्रेसला सवाल

Nagpur भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची गळचेपी होते हा काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांचा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा आणि हास्यास्पद असून, गुडधे यांनी भाजपचे दुकान बंद करण्याची भाषा करण्याऐवजी स्वतःच्या काँग्रेस पक्षाच्या बुडत चाललेल्या दुकानाची चिंता करावी, असा घणाघाती टोला भाजपचे माजी शहराध्यक्ष व मनपा स्थायी समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांनी लगावला आहे.

प्रफुल गुडधे यांनी आपल्या पदग्रहण सोहळ्यात ‘माझ्या वडिलांनी नागपुरात भाजपचे दुकान उघडले होते, ते मुलगा म्हणून मी बंद करणार’ अशी घोषणा केली होती, तसेच भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचा फक्त वापर केला जातो आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकनाथ खडसे, महादेवराव शिवणकर, अरुण अडसड यांना पक्षाने मिठाच्या खड्यासारखे बाहेर काढल्याचा आरोप केला होता; या आरोपांचा बंटी कुकडे आणि भाजपच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. कुकडे यांनी स्पष्ट केले की, भाजपमध्ये जर ओबीसींची गळचेपी होत असती, तर आम्ही आज पक्षात दिसलोच नसतो. आज नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार व नासुप्रचे विश्वस्त कृष्णा खोपडे, पंकज भोयर, आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते हे सर्व ओबीसी समाजाचेच खंदे नेते असून पक्षाने त्यांना नेहमीच सर्वोच्च सन्मान दिला आहे. कृष्णा खोपडे काँग्रेसमध्ये असताना त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती, मात्र भाजपने त्यांना आमदार केले आणि ते पूर्व नागपुरातून पाच वेळा निवडून आले असून त्यांनी तिथे काँग्रेसचे दुकान आधीच बंद केले आहे, तसेच मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ता असताना मला पक्षाने स्थायी समितीचा सभापती आणि शहराध्यक्ष केले, हाच भाजपचा खरा न्याय आहे, असे कुकडे म्हणाले.

Prataprao jadhao : ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? प्रतापराव जाधवांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रफुल गुडधे यांच्यावर ‘जातीवादी’ असल्याचा थेट आरोप करत बंटी कुकडे पुढे म्हणाले की, गुडधे यांनी ओबीसी जातीचे कार्ड वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र नागपूरच्या ओबीसी समाजाने त्यांना दोन्ही वेळा पूर्णपणे नाकारले, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे आणि गुडधे हे वारंवार जातीचा उल्लेख करत असल्याने त्यांचा जातीवादी चेहरा उघडा पडला आहे. गुडधेंच्या वडिलांच्या विधानाचा समाचार घेताना त्यांनी सुनावले की, प्रफुल गुडधे यांचे वडील विनोद गुडधे पाटील हे भाजपमध्ये होते म्हणूनच निवडून आले, जर ते काँग्रेसमध्ये असते तर त्यांना विधानसभेची उमेदवारीसुद्धा मिळाली नसती; त्यामुळे काँग्रेसमधून ओबीसी नेते पक्ष सोडून का पळत आहेत आणि ओबीसी समाज काँग्रेसपासून का दुरावला, याचे आत्मपरीक्षण गुडधेंनी करावे, भाजप हे ओबीसींच्या पसंतीचे घर असून भाजपचे दुकान बंद करण्याचे स्वप्न त्यांनी पाहू नये असे कुकडे म्हणाले. या पत्रकार परिषदेला बंटी कुकडे यांच्यासोबत भाजपचे ओबीसी पदाधिकारी किशन गावंडे, किशोर वानखेडे, नरेश बरडे, अनिल मानापुरे, सचिन करारे, वैभव बावनकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!