Breaking

Case of assault on a Dalit youth : जातीय अत्याचाराविरोधात मेहकरमध्ये संतापाचा उद्रेक

Demand to impose MCOCA on the accused : रोहण पैठणकर प्रकरणी मकोका लागू करण्याची मागणी

Mehkar खामगाव येथे दलित तरुण रोहण पैठणकर याच्यावर झालेल्या अमानवी जातीय हल्ल्याचा तीव्र निषेध करत बुधवारी मेहकर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्तारोको आणि निदर्शन करण्यात आले. ‘आमच्यावर अन्याय चालणार नाही’, ‘मकोका लावा’, ‘संविधानाचा विजय असो’ अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर-बुलढाणा मार्ग दणाणून गेला.

रोहण पैठणकर याचे अपहरण करून त्याला नगर परिषद मैदानात विवस्त्र करून मारहाण करणे, धर्म विचारून हिणवणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करणे — या सगळ्या घटना नृशंसतेची परिसीमा ओलांडणाऱ्या असून या घटनेतील आरोपींवर तात्काळ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

Shivajirao Moghe : महायुती सरकार आदिवासीविरोधी, शिवाजीराव मोघे आक्रमक

या निदर्शनात आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुलतानपूर व वेणी येथे झेंडा प्रकरणानंतर बौद्ध बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात भाई कैलास सुखधाने, ज्येष्ठ नेते सोपानदादा देबाजे, प्रा. डी.एस. वाघ, संघपाल पनाड, तथागत ग्रुपचे अध्यक्ष संदीपदादा गवई, सिध्दांत वानखेडे, प्रा. गजेंद्र गवई, प्रदीप कांबळे, भागवतराव जाधव, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, भीमराव खरात, प्रभाकर आवारे, प्रा. आबाराव वाघ, अ‍ॅड. बबनराव वानखेडे, राधेशाम खरात, शाहीर दुर्गादास काटे, देवानंद वानखेडे, विजय खिल्लारे, विजयराव सपकाळ, तसेच विविध सामाजिक संस्था, कामगार संघटनांचे आणि महिला कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

School ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकारी अटकेत

“आम्ही संविधानाच्या मार्गाने लढतो, पण हा लढा केवळ कायद्यासाठी नाही, तर माणुसकीसाठी आहे,” असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. रोहणवर झालेल्या हल्ल्याला केवळ गुन्हा न मानता तो संविधान व समतेच्या मूल्यांवरील हल्ला मानावा, अशी भूमिका मांडण्यात आली.