Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे राष्ट्रीय राजकारणात पाऊल; या राज्याची सोपवली जबाबदारी

bawankule-appointed-as-observor-for-odisha-elections : विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून पर्यवेक्षकपदी नियुक्ती

Nagpur भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ओडिसा राज्याचे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली असून, या माध्यमातून बावनकुळे यांचे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय पाऊल पडणार आहे.

महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यात पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मानले जाणारे ‘महसूल’ खाते त्यांच्याकडे सोपवले. सध्या ते नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

Pravin datke : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील कामगार मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव कोणी रोखला?

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने रवींद्र चव्हाण यांची त्या पदावर नियुक्ती केली होती. मात्र, बावनकुळे यांची कामाची ऊर्मी आणि कार्यकर्त्यांचे दांडगे नेटवर्क पाहता, त्यांच्याकडे राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख पद देण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती करूनही बावनकुळे यांच्या रणनीतीपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

Mumbai municipal corporation : भाजपने आरोप करताच ३८५ कोटींची निविदा काही तासांत रद्द

चंद्रशेखर बावनकुळे यांची राजकीय कारकीर्द नागपूर जिल्हा परिषदेतून सुरू झाली. त्यानंतर कामठी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून आपली छाप पाडली होती. आता राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या नव्या जबाबदारीमुळे त्यांच्या राजकीय वजनात मोठी वाढ झाली आहे.