Breaking

Chandrashekhar Bawankule : बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सशिवाय पगार नाही

No salary without biometric or face attendance : पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा; आरोग्यसेवेशी संबंधित समस्यांवर होणार बैठक

Amravati जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्स प्रणालीद्वारे हजेरी नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टपासून या प्रणालीशिवाय कोणालाही वेतन दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील काही कार्यालयांमध्ये ही प्रणाली असताना देखील हजेरी नोंदवली जात नसून, तरीही वेतन मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कार्यवाही होत आहे. हजेरी नोंदविल्याशिवाय वेतन मिळाल्यास संबंधित विभागप्रमुखावर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी सीएस डॉ. दिलीप सौंदळे यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातील १५० रुग्णवाहिकांपैकी अनेकांना चालक नाही, तसेच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

Mahayuti Government : विकासकामांना खीळ! साडेतीन महिन्यांनंतरही आमदार निधी नाहीच

मेळघाटातील चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून, अलीकडेच सलग पाच दिवस वीज नसल्याने रुग्णसेवेला अडथळा निर्माण झाला होता. आ. संजय खोडके यांनी अनेक रुग्णालयांत बालरोग तज्ज्ञांची अनुपलब्धता ही समस्या मांडली.

या सर्व समस्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी ३१ जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : कामठीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरसावले गडकरी!

यावेळी बावनकुळे म्हणाले, “प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने कामावर रुजू झाल्यानंतर लगेच बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सद्वारे हजेरी नोंदवावी. जिल्हाधिकारी याबाबत स्वतः लक्ष ठेवतील. प्रणालीचा प्रभावी अंमल झाला पाहिजे.”

बैठकीला आ. संजय खोडके, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सीईओ संजीता महापात्रा, माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : मंत्री, नेत्यांसोबत सगळेच फोटो काढतात, पण..

या वेळी तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना “तुमच्या तालुक्यात समस्या नाहीत का?” असा थेट सवाल करत पालकमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर तुमच्या भागातून तक्रार आली तर थेट पाहणी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.”

दरम्यान, चिखलदऱ्यात पर्यटनाला आलेल्या वाहनांची संख्याही घटलेली आढळून आली. मागील शनिवारी २३०० चारचाकी आणि ४०० दुचाकींसह १६-१७ हजार पर्यटकांनी चिखलदरा गाठले होते. मात्र, याच शनिवारी केवळ ९०० चारचाकी व २००-२५० दुचाकी, म्हणजे फक्त ४ हजार पर्यटक चिखलदऱ्यात दाखल झाले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.