Chandrashekhar Bawankule, Pankaj Bhoyar : मंत्री येती घरा, प्रशासन पळती भरा भरा..!

 

Three ministers will visit Amravati in two days : अमरावतीत दोन दिवसांत तीन मंत्र्यांचे दौरे; प्रशासनाची धावपळ

Amravati अमरावती जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत तीन मंत्र्यांचे दौरे होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे हे 10 आणि 11 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी येणार आहेत. या तीन मंत्र्यांच्या सलग दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनावर ताण वाढला आहे. विविध यंत्रणांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

पालकमंत्री बावनकुळे गुरुवारी (10 एप्रिल) सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर 11.45 वाजता पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसिस सेंटरचे उद्घाटन करतील. दुपारी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात बळीराजा प्रकल्पग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रमात सहभागी होतील.

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

याशिवाय, 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ आणि ‘हॅलो कलेक्टर संवाद’ यांचा शुभारंभ करतील. नंतर महसूल वाचनालयाचे उद्घाटन, लाभार्थ्यांना फ्री होल्ड जमीन प्रमाणपत्रे आणि सरपंचांना रस्ते नकाशे वाटप हे कार्यक्रम देखील होतील. दुपारी 3 वाजता शहर पोलिसांच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होऊन, सायंकाळी 4 वाजता नागपूरकडे रवाना होतील.

त्याच दिवशी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सकाळी 5.50 वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर आगमन करतील. विश्रांतीनंतर, सकाळी 9 वाजता महापालिका सभागृहात शिक्षण विभागीय आढावा बैठक घेतील आणि 10.30 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते पुलगावकडे रवाना होतील.

Chandrashekhar Bawankule : सपकाळांनी आपली उंची तपासावी आणि मगच..

दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (11 एप्रिल) क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 9 वाजता विश्रामगृहात आगमन होईल. 10.15 वाजता संतोष महात्मे यांच्या निवासस्थानी, तर 11 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल वितरण करतील. दुपारी 1 वाजता सुरेखाताई ठाकरे आणि 2 वाजता आमदार संजय खोडके यांच्या निवासस्थानी भेट देतील.