Chandrashekhar Bawankule : भाजपवर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही !

Uddhav Balasaheb Thackeray’s Shiv Sena Cannot Grow Without Targeting BJP : भाजपमध्ये ५१ टक्के मते घेण्याची क्षमता

Nagpur : स्वतःचे लोक सांभाळता आले नाही म्हणून पक्ष फुटला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता उरले सुरले लोकही त्यांचे ऐकेनासे झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना डबघाईस आली आहे. आता कसेबसे उरलेले पदाधिकारी, कार्यकर्ते सांभाळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी ते काहीबाही बोलत सुटतात. भाजपला टार्गेट केल्याशिवाय आता त्यांची वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे ते आमच्या विरोधात सातत्याने बोलत असतात, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली.

नागपुरात आज (३ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे विमनस्क झाले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे त्यांचा कालचा दसरा मेळावा. त्यांची मानसिकता विकृत झाली आहे. निवडणूक हरल्यानंतर ते मानसिकरित्या दबावात आहेत. कालचे उद्धव ठाकरे यांचे भाषण पूर्णतः विकृती दर्शवणारे होते, असे मला वाटते. त्यामुळे आता मुंबई अन् महाराष्ट्राची जनता त्यांना गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्राला आता कळून चुकलं आहे की कोण खरं आणि कोण खोटं.

BJPs criticism : उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर भाजपचा हल्लाबोल

५१ टक्के मते घेण्याची क्षमता फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच विरोधकांकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. उद्धव टाकरे यांना माहिती आहे की, भाजपवर बोलल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही. भाजप आता खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेत आहे आणि आम्ही निवडणूक आल्यानंतर वेळेवर तयारी करत नाही. तर लढण्यासाठी नेहमी तयार असतो. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकालही आमच्याय बाजुने लागतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Jarange Vs Munde : माझ्या नादी लागू नका… राजकारण संपवेन !

महसूल मंत्री बावनकुळे यांनी इलेक्ट्रॉनिक बाॅंडसंदर्भातही यावेळी माहिती दिली. ते म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुद्रांक विभाग इलेक्ट्राॅनिक बॉंड लॉंच करतो आहे. ई प्रणालीच्या माध्यमातून आता स्टॅम्प पेपरची गरज राहणार नाही. राज्यातील हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे नागरिकांना आता अधिक वेगाने दर्जेदार सुविधा मिळतील.