व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Jarange Vs Munde : माझ्या नादी लागू नका… राजकारण संपवेन !

Jarange Vs Munde : माझ्या नादी लागू नका… राजकारण संपवेन !

Manoj Jarange Patils warning to Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत थेट धनंजय मुंडेंना इशारा दिला. “माझ्या जातीच्या नादी लागू नकोस, नाहीतर तुझं राजकारण संपवेन. तुझ्या करिअरचा देव्हारा करून टाकेन, राजकारणातून नामोनिशाण मिटेल,” अशा कठोर शब्दांत त्यांनी धमकी दिली.

जरांगे यांना विचारण्यात आले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून का द्यावं?” यावर जरांगे आक्रमक झाले. त्यांनी धनंजय मुंडेंना उद्देशून प्रत्युत्तर दिलं की, “तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायचं तर कशाला घेतलं? आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाचं का खातोस? दिसतोस का त्यांच्यासारखा?” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Kadam Vs Raut : ‘बाळासाहेबांची डेडबॉडी दोन दिवस… ‘ ही तर बेइमानी !

जरांगेंनी पुढे स्पष्ट केलं की, “शहाणपणा करायचा नाही. माझ्या जातीवर बोलायचं नाही. माझ्या नादाला आलास तर बाजार उठवेन. छक्के-पंजे माझ्यासोबत खेळू नको. अजित पवारलाही यात अडकवेन. मी जातीला कट्टर मानणारा आहे. ज्याच्या प्रचाराला जाणार, त्या सीट पाडून टाकेन.”

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “आमच्या ताटातलं घेऊ नका.” त्यावर जरांगे म्हणाले, “तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडता. बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या, लोकांचं वाटोळं केलं. काय ज्ञान शिकवता?” असं टोला त्यांनी लगावला.

Reservation controversy : ईडब्ल्यूएस, एसईबीसी अन् आता ओबीसी

लक्ष्मण हाकेंबाबत प्रश्न विचारला असता, जरांगे यांनी “अशा प्रश्नांची उत्तरं नका विचारू, मी त्यांना मोजीत नाही,” असं स्पष्ट सांगितलं.

शेवटी धनंजय मुंडेंना उद्देशून ते म्हणाले, “शहाणा असशील तर अजून वेळ गेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नकोस. मराठे हुशार झाले आहेत, आता आम्ही कडवट राहणार. तुमचं राजकारण संपवून टाकू,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!