Uddhav Thackeray will also be the president of ‘Aurangzeb Fans Club’ : बावनकुळे यांची बोचरी टीका; २०४७ पर्यंत महाविकास आघाडीला ‘नो स्कोप’
Amravati “उद्धव ठाकरे यांच्या नाशिक, परभणी आणि धाराशिव येथील सभांमध्ये खासदार निवडून आले. तेव्हा पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडवले. मतांसाठी लांगूलचालन करत त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘औरंगजेब फॅन्स क्लब’चे सदस्य झाल्याचे मी म्हटले होते. भविष्यात ते या क्लबचे अध्यक्ष होतील,” अशी बोचरी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘ज्या दिवशी काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करेन.’ मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी हिंदू धर्म आणि भगव्या ध्वजाचा विचार सोडला आहे. संजय राऊत काय बोलतात, याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील जनतेनेही त्यांना ऐकणे सोडले आहे,” असेही बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..
“दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. जोपर्यंत पोलीस अंतिम निष्कर्षावर येत नाहीत, तोपर्यंत या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असे बावनकुळे म्हणाले.
“पाकिस्तानची क्रिकेट टीम जिंकली की इथे फटाके फुटतात, पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो. काही लोक इथल्या सुविधा उपभोगतात आणि पाकिस्तानचे गुणगान करतात. अशा ठिकाणी महाराष्ट्रविरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जाते. याच विषयावर नितेश राणे यांनी भूमिका मांडली आहे,” असेही बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..
“२०४७ पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला राज्यात आणि देशात वाव नाही. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातच राहावे. त्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो,” असे बावनकुळे म्हणाले. “रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची लवकरच बैठक होणार आहे. मीही या बैठकीत सहभागी होणार आहे. अधिवेशनामुळे बैठक लांबणीवर गेली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“संभाजी भिडे आणि प्रकाश आंबेडकर काय म्हणाले, यापेक्षा देशाचा इतिहास आणि संस्कृती काय सांगते, ते महत्त्वाचे आहे,” असेही बावनकुळे यांनी सांगितले.








