Chitra Wagh : महिलांना ‘खर्रा खाणाऱ्या’ म्हणणाऱ्या दोडक्या भावाला धडा शिकवा

Teach a lesson to those who use abusive words against women : चित्रा वाघ यांचे आवाहन, धामणगाव येथे प्रचार सभा

Amravati “धामणगावच्या विकासात कोणताही हातभार नाही, केवळ आरोप करून राजकारण करणाऱ्या आणि महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या ‘दोडक्या भावाला’ या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

धामणगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार अर्चना अडसड-रोठे तसेच नगरसेवकपदासाठी मैदानात उतरलेल्या २० उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महिला आघाडी मेळाव्यात त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. या योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तरीही काही ‘दोडके भाऊ’ महिलांविरोधात अपमानास्पद भाषा वापरतात. अशांना मतपेटीतून धडा शिकवणे गरजेचे आहे.”

Local Body Elections : रवी राणांचा हात पुन्हा ‘भाजप के साथ’!

मेळाव्यात बोलताना आ. प्रताप अडसड म्हणाले– मागील १५ वर्षांत धामणगाव शहराचा सर्वाधिक विकास झाला. महिलांच्या सुरक्षेसाठी ३ कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शास्त्री चौक–अजनसिंगीसह चार रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर आहे. गटार योजना मंजूर होताच कामाला सुरुवात होईल. त्यांनी म्हटले की, विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्याने ते फक्त निराधार आरोप करत आहेत.

Election Commission : शिक्षक मतदारसंघाच्या यादीत घुसवले बोगस मतदार!

भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना अडसड यांनी सांगितले— शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. महिलांसाठी रोजगार निर्मितीचे क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणारे विविध उपक्रम राबविले जातील.