व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chlorine Gas Leak : दिवस उजाडताच गोधनीत घबराट…अनेकांची रुग्णालयात धाव… ट्रीटमेंट प्लांटमध्ये...

Chlorine Gas Leak : दिवस उजाडताच गोधनीत घबराट…अनेकांची रुग्णालयात धाव… ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीन गॅस गळती

Panic in Godhani at Daybreak… Many Rush to Hospitals… Chlorine Gas Leak at Treatment Plant:
अग्निशमन दल, NDRF आणि OCWच्या संयुक्त मोहिमेत पहाटे ५.३० वाजता गळतीवर नियंत्रण

Nagpur : गोधनी परिसरातील नागरिकांसाठी सोमवारची पहाट अत्यंत भीतीदायक ठरली. येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधील ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून अचानक गळती सुरू झाली. मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास गॅस गळती झाल्यानंतर वाऱ्यासोबत हा विषारी गॅस आजूबाजूच्या नागरी वस्तीत पसरला. पहाटे उठताच नागरिकांना तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास, खोकला, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने परिसरात एकच घबराट उडाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ध्वनिक्षेपकावरून आजूबाजूच्या वस्तीतील लोकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याच्या सूचना दिल्या.घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन वॉटर टेंडर आणि ‘ब्रीदिंग ॲपरेटस’ सह जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच ओसीडब्ल्यूचे कर्मचारी आणि एनडीआरएफच्या चमूलाही तातडीने पाचारण करण्यात आले.

Sunil Deshmukh : नेतेच ठरताहेत जनतेचे शत्रू; माजी पालकमंत्री सरकारवर बरसले!

अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि ओसीडब्ल्यूच्या संयुक्त प्रयत्नाने पहाटे ५:३० च्या सुमारास गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर बचाव पथकाने संबंधित क्लोरीन सिलेंडर कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून संभाव्य मोठा धोका टाळला. गॅसच्या संपर्कात आल्यामुळे त्रास झालेल्या बाधित नागरिकांना उपचारासाठी झिंगाबाई टाकळी येथील ‘स्पर्श हॉस्पिटल’ आणि शासकीय ‘मेयो रुग्णालयात’ दाखल करण्यात आले असून सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

error: Content is protected !!