व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दिल्लीला जाण्याआधी थांबा! रेल्वेचा अचानक मोठा निर्णय; सर्व गाड्या रद्द

दिल्लीला जाण्याआधी थांबा! रेल्वेचा अचानक मोठा निर्णय; सर्व गाड्या रद्द

देशभरात राजकीय भूकंप, सिजेपीचे १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलन

New delhi जर तुम्ही उद्या, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीला जाण्याचा बेत आखला असाल, तर तो तत्काळ रद्द करा. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने जंतरमंतर येथे पुकारलेल्या आंदोलनाच्या धसक्यानेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा जोरदार आरोप विरोधकांनी केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि एसआयआर च्या विरोधात सध्या देशभरात संतापाची लाट आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी यापूर्वी निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडक दिली होती, तसेच राजघाटावर मौन आंदोलनही केले होते. या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून उद्या १० ऑक्टोबर रोजी काँक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतरमंतरवर महाआंदोलनाची हाक देण्यात आली होती. न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी कार्यकर्ते आणि देशभरातील युवक आंदोलन करण्यावर ठाम आहेत. हजारो युवक दिल्लीत दाखल होण्याच्या तयारीत असतानाच अचानक दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने विरोधकांचा पारा चढला आहे.

५५० कोटींची अनियमितता तरी सत्तेसाठी मात्र कोट्यवधींची रस्सीखेच!

रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या या निर्णयावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर आरोपांचा प्रचंड धुरळा उडवला आहे. केंद्र सरकार तरुणांच्या आंदोलनाला घाबरले असून ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशात एक प्रकारे अघोषित आणीबाणी’ लागू करून नागरिकांच्या प्रवासाच्या आणि लोकशाही मार्गाने विरोध करण्याच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, दिल्लीच्या सीमेवर आणि राजकीय पटलावर ताणतणाव कमालीचा वाढला आहे.

error: Content is protected !!