Claim of finding drugs : उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ १४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा दावा !

Allegation of suppressing information, Sushma Andhares attack on Tushar Doshi, government : माहिती दडपल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा एसपी तुषार दोशी, सरकारवर गंभीर हल्लाबोल

Satara : जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळच १४५ कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज सापडल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जाणीवपूर्वक लपवली असल्याचा गंभीर दावा देखील त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी साताऱ्यातील सावरी गावात एका पत्र्याच्या शेडवर धाड टाकून सुमारे ४५ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १४५ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्याची फॅक्टरी असल्याचा संशय असून, ही कारवाई सुरुवातीला मुकुंद गावातून सुरू होऊन त्याचे धागेदोरे सावरी गावापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात विशाल मोरे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Municipal election : नागपूर महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण दुबार मतदारांचा गुंता

सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडले त्या शेडजवळ एक आलिशान रिसॉर्ट उभे राहात आहे. कोयना बॅकवॉटर परिसरात असलेल्या या ठिकाणी रस्ता, स्विमिंग टँक, सात ते आठ खोल्यांचा रिसॉर्ट आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, वस्ती नसलेल्या या भागात ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता का तयार करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा असल्याचा दावा त्यांनी केला असून, ‘हॉटेल तेजयश’ असे त्याचे नाव आहे. तेज आणि यश ही प्रकाश शिंदे यांच्या मुलांची नावे असल्याचेही त्यांनी सांगितले.

या शेडमध्ये काम करणारे तीन जण हे स्थानिक नसून आसाम किंवा बांगलादेशी असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. या तिघांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंचतारांकित हॉटेलमधील जेवण या कामगारांना कसे परवडत होते, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या तिघांची नावे पोलिसांच्या एफआयआरमध्ये नसल्याचा आरोप करत एफआयआरच ऑनलाइन उपलब्ध नसल्याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.

Pragya Rajiv Satav : स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला !

या प्रकरणात शेडचा मालक गोविंद सिंदकर असून, ओंकार दिघे याने शेडची चावी घेतल्याची माहिती समोर आली आहे. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले, मात्र त्याला का सोडण्यात आले, याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच, एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मूळ गावाचा सरपंच रणजीत शिंदे याचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Shindes criticis : मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल

या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एखाद्या प्रकरणात मुलाचे नाव आल्यास मंत्र्याचा राजीनामा मागितला जातो, तर ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणात भावाचे नाव समोर आल्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच, हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर माझ्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आरोप गंभीर असल्याने आता पोलीस तपास आणि सरकारची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

__