2500-employment-to-be-generated-from-single-project-cm-fadnavis : एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन
Nagpur अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख आणि आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्क चे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.
Teachers constituency : या शिक्षक मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेन मध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे. त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे. ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची भूमिका महत्त्वाची ठरते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती
आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थे बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नात आहे.
त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे. यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्त्वाची भूमिका आहे. एक्सएसआयओने नेक्स्ट जेन बाबतही देशात अन्य ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारताना नागपूरलाही प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनवताना या पार्कने महत्वाची भूमिका वठवावी असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टिने महत्त्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे. एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८ हजार १४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५ हजारहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.








