Breaking

CM Devendra Fadnavis : वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वीज नियोजन!

Plan electricity considering the growing population : मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; आराखडा तयार करणार

Nagpur एकीकडे वाढती मागणी आणि दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी, या दोन्हींचा फटका नागरिकांनाच बसत आहे. अश्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व अमरावती जिल्ह्यासाठी नवीन वीज आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नागपूर व अमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावती मधील वीज कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करा. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन वीज मागणीचे नियोजन आताच करा. दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करा असे निर्देश त्यांनी दिले.

Harshvardhan Sapkal : हा तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार

मुंबई विधानभवन येथे आयोजित नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, मोहन मते, यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर व अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजनुही नवीन प्रकल्प वाढत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करावी. नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपयांचे वीज क्षेत्रातील कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे या निधीची तरतूद करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Bacchu Kadu : ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, बच्चू कडू यांचे भर पावसात आंदोलन

फडणवीस यांनी भुयारी केबल्सना होणाऱ्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सुरक्षित केबल डक्ट प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले. तसेच सुधारित वीज क्षेत्र योजना,कुसुम-ब योजना,मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना,ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी,नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली.