Coal minister G kishan Reddy : जमीन देणाऱ्या स्थानिकांनाच प्रकल्पात रोजगार द्या; केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्ट निर्देश

Employment-compulsary-locals-in-induatrial-projects : भद्रावती येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून साकारणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन

Chandrapur : देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. चंद्रपूर आणि भद्रावती परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जे प्रकल्प येत आहेत, त्यातून या भागाचा कायापालट होणार आहे. मात्र, ज्या भूमिपुत्रांनी या प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांना या दोन्ही कंपन्यांनी रोजगारात प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केले.

भद्रावती येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून साकारणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोळसा क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीवर भाष्य केले. जी. किशन रेड्डी म्हणाले की, आतापर्यंत आपण कोल गॅसिफिकेशनसाठी परदेशावर अवलंबून होतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान भारतात आणले जात आहे.

Devendra Fadnavis : दावोसमध्ये करार, विदर्भात भूमिपूजन! तीन मोठे प्रकल्प आले

देशातील प्रस्तावित ७ कोल गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प याच भागात येत असून, चंद्रपूर जिल्हा भविष्यात या क्षेत्राचे प्रमुख ‘हब’ म्हणून ओळखला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रेटा एनर्जीचा ‘ग्रीनफिल्ड स्टील प्रकल्प’: कोळसा गॅसिफिकेशनवर आधारित या स्टील प्रकल्पात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १० हजार ३१९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

Uday samant : आम्ही जन्मापासूनच झुकत नाही, ‘पुष्पा स्टाईल’ची गरज नाही

यातून सुमारे ५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनुप गोयल यांनी दिली. न्यू एरा क्लिनटेकचा कोळसा ते रसायने प्रकल्प हा १६५० एकरवर पसरलेला हा भारतातील पहिला एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प असेल. यात दरवर्षी ५० लाख मेट्रिक टन कोळशावर प्रक्रिया करून उच्च दर्जाची रसायने तयार केली जातील.

न्यू एरा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू मांडल्या. ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांनी देश उभारणीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या प्रकल्पांनी स्थानिकांना मोठ्या प्रमाणात सामावून घ्यावे आणि प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहनही मंत्री रेड्डी यांनी यावेळी कंपन्यांना केले.