व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress proposal : उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभा काँग्रेसला द्यावी !

Congress proposal : उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभा काँग्रेसला द्यावी !

mva-rajya-sabha-vidhan-parishad-seat-sharing-harshvardhan-sapkale-sanjay-raut : काँग्रेसच्या प्रस्तावामुळे मविआत खळबळ; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका

Mumbai: आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मविआने एकत्रितपणे निवडणूक लढवावी आणि राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका सामोऱ्या जाण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मविआचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, असा आमचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी नमूद केले. या विधानानंतर आघाडीत मतभेद निर्माण होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Devendra fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा!

या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, हा विषय प्रामुख्याने विधिमंडळाशी संबंधित असून तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसल्यानंतरच अंतिम निर्णय होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात अधिकृत चर्चा झालेली नाही. त्यामुळे सध्या बाहेर व्यक्त होणाऱ्या मतांवरून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधिमंडळात सक्रिय व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र त्यांची वैयक्तिक भूमिका काय आहे, हे जाणून घेतल्यानंतर आणि तिन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही राऊत यांनी सांगितले. मविआमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते आणि प्रत्येक पक्षाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अंतिम निर्णय मात्र एकमताने घेतला जातो, असे त्यांनी अधोरेखित केले.

Criticism on ruling party : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन म्हणजे लोकशाहीची विटंबना !

दरम्यान, महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही राऊत यांनी टीका केली. महायुतीमध्ये सध्या अनेक जण स्वतंत्र भूमिका मांडताना दिसतात, अशी टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी मराठी भाषेचा आणि वाक्प्रचारांचा अभ्यास करावा, असा टोला लगावला.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत जागावाटपाचे गणित कसे जुळते आणि उद्धव ठाकरे यांची अंतिम भूमिका काय राहते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!